'पीके'ची कमाई ६०० कोटी अन् सुशांतची अवघे २१ रुपये!

छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला राजकुमार हिरानी यांच्या  'पीके' या सिनेमात एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. आश्चर्य म्हणजे, या भूमिकेसाठी सुशांतला केवळ २१ रुपये मिळालेत. 

Updated: Jan 15, 2015, 01:00 PM IST
'पीके'ची कमाई ६०० कोटी अन् सुशांतची अवघे २१ रुपये! title=

मुंबई : छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला राजकुमार हिरानी यांच्या  'पीके' या सिनेमात एक छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. आश्चर्य म्हणजे, या भूमिकेसाठी सुशांतला केवळ २१ रुपये मिळालेत. 

आमिर खान स्टारर 'पीके' या सिनेमानं आत्तापर्यंत कमाईचे सगळे रेकॉर्डस् तोडलेत. वादग्रस्त ठरलेल्या या सिनेमानं आंतरराष्ट्रीय पातळीवर ६०० करोड रुपयांची कमाई केलीय. इतकी कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिलाच सिनेमा ठरलाय. 

भारतातही या सिनेमानं ३२० करोड रुपयांच्या पलिकडे झेप घेतलीय. अनेकांच्या तोंडून याच सिनेमाची चर्चा ऐकायला मिळतेय. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतकी मोठी कमाई करणाऱ्या या सिनेमात एक महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुशांतला मात्र मानधन म्हणून केवळ २१ रुपये मिळालेत.

या मागचं कारण म्हणजे सुशांत बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा खूप मोठ्ठा फॅन आहे... यामुळे जेव्हा ही भूमिका त्याला ऑफर झाली तेव्हा त्यानं 'सायनिंग अमाऊंट' म्हणून केवळ २१ रुपयांचा स्वीकार केला. 

सुशांतच्या या व्यवहारावर खूश होऊन हिरानी यांनीही त्याला आपल्याकडील सिनेमेटोग्राफी आणि अभिनयावर आधारीत अशी अनेक पुस्तकं भेट म्हणून दिलीत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.