हा रिक्षावाला सध्या झालाय व्हायरल...

मुंबई : समाजात आपल्या आजूबाजूला अनेक रत्न दडलेली असतात.

Updated: Apr 7, 2016, 08:57 PM IST
हा रिक्षावाला सध्या झालाय व्हायरल... title=

मुंबई : समाजात आपल्या आजूबाजूला अनेक रत्न दडलेली असतात. यातील काही रत्नांना केवळ संधी मिळत नाही. पण, म्हणून या रत्नांचं सौंदर्य काही कमी होत नाही. 

सध्या फेसबूकवर पाकिस्तानच्या एका रिक्षावाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा रिक्षावाला साधा नसून तो एक चांगला सूफी गायक आहे. कराची शहरातील एका व्यक्तीने या रिक्षावाल्याचा व्हिडिओ फेसबूकवर अपलोड केलाय. संगीतकार आणि गायक कौशल इनामदारांनीही त्याचा हा व्हिडिओ शेअर केलाय. 

त्याच्या सुरांची सध्या फारच चर्चा आहे. तुम्हीही ऐका या रिक्षावाल्याचे मधूर स्वर...

Meanwhile in Pakistan...

Posted by Kaushal S Inamdar on 6 April 2016