नव्या वर्षात वरुण धवन प्रेम जाहीर करणार

बॉलीवूड अभिनेता वरुण धवनला अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये त्याच्या प्रेयसीबद्दल विचारण्यात आलेय. मात्र अद्याप त्याने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाहीये. मात्र नव्या वर्षात आपले प्रेम जाहीर करणार आहे. 

Updated: Jan 5, 2016, 03:49 PM IST
नव्या वर्षात वरुण धवन प्रेम जाहीर करणार title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता वरुण धवनला अनेकदा रिअॅलिटी शोमध्ये त्याच्या प्रेयसीबद्दल विचारण्यात आलेय. मात्र अद्याप त्याने याबाबत कोणताही खुलासा केलेला नाहीये. मात्र नव्या वर्षात आपले प्रेम जाहीर करणार आहे. 

नताशा दलाल वरुणची गर्लफ्रेंड आहे. नताशासोबतचे संबंध लपविणे आता कठीण होत असल्याचे वरुणने म्हटलेय. ज्याप्रमाणे वरुण लाईमलाईटमध्ये आहेत त्याचप्रमाणे त्याची गर्लफ्रेंडही असावी असे वरुणला वाटत असल्याने तो त्याचे प्रेम जाहीर करणार आहे. 

नुकताच वरुण धवनचा दिलवाले हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने शाहरुखच्या भावाची भूमिका केली होती.