VIDEO ट्रेलर : 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'त दिसतंय सेक्सी भूत!

'मस्ती' सीरिजचा तिसरा अडल्ट सिनेमा 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

Updated: Jun 17, 2016, 01:36 PM IST
VIDEO ट्रेलर : 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'त दिसतंय सेक्सी भूत! title=

मुंबई : 'मस्ती' सीरिजचा तिसरा अडल्ट सिनेमा 'ग्रेट ग्रॅन्ड मस्ती'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

तुम्हाला एव्हाना 'मस्ती'च्या डबल मिनिंग डॉयलॉग्जची सवय झाली असेल... यातही तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे. फरक इतकाच की या सिनेमात 'थ्रिल' म्हणून एक 'सेक्सी भूत'ही पाहायला मिळतंय. 

या सिनेमात रितेश देशमुख, विवेक ऑबेरॉय आणि आफताब शिवदासानी मुख्य भूमिकेत आहेत. तर सना खान, उर्वशी रौतेला आणि पूजा चोपडा यांच्याही यात भूमिका पाहायला मिळतील. 

२२ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.