व्हिडिओ: पाहा 'फायडिंग फॅनी'चा ट्रेलर

दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूरचा आगामी सिनेमा 'फायडिंग फॅनी'चा ट्रेलर रिलीज झालाय. 

Updated: Jul 9, 2014, 06:32 PM IST
व्हिडिओ: पाहा 'फायडिंग फॅनी'चा ट्रेलर title=
फाईल फोटो

मुंबई: दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूरचा आगामी सिनेमा 'फायडिंग फॅनी'चा ट्रेलर रिलीज झालाय. 

फिल्मच्या ट्रेलरमध्ये बहुतेक स्टार कास्ट ही इंग्रजी बोलताना दिसतेय. 
दीपिका आणि अर्जुनच्या व्यतिरिक्त फिल्ममध्ये नसीरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूर ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिल्मचं शूटींग फक्त एका शेड्युलमध्ये पूर्ण केलं गेलंय. दिग्दर्शक होमी अदजानियांचं म्हणणं आहे की, ही फिल्म माझ्या खूप आवडीची आहे. केवळ ३६ दिवसांत सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त एका शेड्युलमध्ये फिल्म पूर्ण केली आहे. 

होमीने याबद्दल सांगितले की, प्रेम सामान्य लोकांपासून खूप विचित्र काम करुन घेतात. 'पण जेव्हा ती लोकच जर विचित्र असतील तर? दीपिका आणि अर्जुनने ही फिल्म त्यांची फिल्म "चेन्नई एक्सप्रेस" आणि "टू स्टेटस" रिलीज होण्याआधीच साईन केली होती.' 

ही फिल्म नसीर (नसीरुद्दीन शाह) शिवाय पूर्ण झाली नसती, 'कारण फिल्म मधली त्यांची भूमिका ही खास त्यांच्यासाठी लिहिली होती. तसंच डिंपल कपाडियांबाबतही, त्यांच्याशिवाय मी फिल्म बनवली तर तिनं डोकं काढून प्लेटमध्ये ठेवलं असतं,' असंही होमी म्हणाले. 
 
याआधी डिंपल आणि नसीर यांनी 'बीइंग सायरस' फिल्ममध्ये एकत्र काम केले होते. पंकज कपूरसोबत काम करण्याचे होमीसाठी पहिलीच संधी आहे. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.