व्हिडिओ : मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'चा टीजर प्रदर्शित

फॅशन, चांदनी बार, हिरोईन यांसारख्या सुपरहीट सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या आगामी 'कॅलेंडर गर्ल' या  सिनेमाचा टीजर प्रदर्शित झालाय. 

Updated: Aug 18, 2015, 05:43 PM IST
व्हिडिओ : मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'चा टीजर प्रदर्शित  title=

नवी दिल्ली : फॅशन, चांदनी बार, हिरोईन यांसारख्या सुपरहीट सिनेमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक मधुर भांडारकर याच्या आगामी 'कॅलेंडर गर्ल' या  सिनेमाचा टीजर प्रदर्शित झालाय. 

मधुरच्या इतर सिनेमांप्रमाणेच हा सिनेमाही तितकाच बोल्ड आणि बिनधास्त असल्याचं हा टीझर पाहून लक्षात येतं. 'कॅलेंडर गर्ल्स' हा सिनेमाही वरतून चकाचक दिसणाऱ्या जगात वावरणाऱ्या मॉडल्सच्या जीवनावर आधारित असल्याचं दिसतंय. 

पाच मॉडल्सच्या भूमिकेत आकांक्षा पुरी, अवनी मोदी, कायरा दत्ता, रुही सिंह आणि सतरुपा पाईन या दिसणार आहेत. या सिनेमातून या सर्व मॉडेल्स आपला बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

व्हिडिओ पाहा :- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.