शाहिदच्या लग्नात ३ आई, ३ वडील आणि ३ प्रेयसीही?

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकतीच त्यांची लग्नपत्रिका छापून झाली असून ती खूप आकर्षक आणि सुंदर डिझाईन करण्यात आली आहे. या लग्नाला बरेच फिल्मी चेहरे हजेरी लावणार आहेत. शाहिदच्या लग्नाला तीन या संख्येला वेगळेच महत्त्व आहे.

Updated: Jul 2, 2015, 04:13 PM IST
शाहिदच्या लग्नात ३ आई, ३ वडील आणि ३ प्रेयसीही? title=

मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकतीच त्यांची लग्नपत्रिका छापून झाली असून ती खूप आकर्षक आणि सुंदर डिझाईन करण्यात आली आहे. या लग्नाला बरेच फिल्मी चेहरे हजेरी लावणार आहेत. शाहिदच्या लग्नाला तीन या संख्येला वेगळेच महत्त्व आहे.

लग्नाचे आमंत्रण बेला आणि विक्रमादित्य राजपूत, नीलिमा अजीम तसेच सुप्रिया आणि पंकज कपूर या तीघांच्यावतीने देण्यात आले आहे. शाहिदचे लग्न ७ जुलैला होणार असून १२ तारखेला रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. यासाठी फिल्म इंडस्ट्रीतील शाहिदच्या सर्व मित्रांना आमंत्रण देण्यात येणार आहे. 
 
आतापर्यंत त्यांच्या लग्नाची तारीख तीन वेळा बदलली आहे. हे लग्न डिसेंबरमध्ये होणार होतं जे नंतर १२ जून, १२ जुलै आणि शेवटी ७ जुलैला निश्चित झालंय. या लग्नात नीलिमा अजीम, सुप्रिया पाठक आणि वंदना संजानी या तीन आई उपस्थीत राहणार आहेत. तसेच आशीर्वाद द्यायला पंकज कपूरसह राजेश खट्टर आणि रझा अली खान हे तीन वडीलही उपस्थीत राहणार आहेत.

या लग्नाला इशान खट्टर, सना कपूर आणि रूहान कपूर ही तीन भावंडही उपस्थीती लावणार आहेत. आता शाहिदच्या तीन प्रेयसीही लग्नाला येणार का? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.