आठवड्याभरात 'दिलवाले' १०० कोटी पार

प्रदर्शनाच्या आठवड्याभरात रोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले या चित्रपटाने भारतात १०० कोटींचा आकडा पार केला. सात दिवसांत या चित्रपटाने १०२.६५ कोटींची कमाई केलीय. तर सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भरारी घेणाऱ्या बाजीराव मस्तानी चित्रपटाने ८६.१५ कोटींचा गल्ला जमवलाय. 

Updated: Dec 25, 2015, 05:09 PM IST
आठवड्याभरात 'दिलवाले' १०० कोटी पार title=

नवी दिल्ली : प्रदर्शनाच्या आठवड्याभरात रोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले या चित्रपटाने भारतात १०० कोटींचा आकडा पार केला. सात दिवसांत या चित्रपटाने १०२.६५ कोटींची कमाई केलीय. तर सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भरारी घेणाऱ्या बाजीराव मस्तानी चित्रपटाने ८६.१५ कोटींचा गल्ला जमवलाय. 

दिलवालेने भारतात वीकेंडमध्ये ६५.०९ आणि वीकडेजमध्ये ३७.५६ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसरीकडे बाजीरावने वीकेंडमध्ये ४६.७७ आणि वीकडेजमध्ये ३९.३८ कोटी रुपये कमावले. 

दोन्ही चित्रपटांनी मिळून भारतात आठवड्याभरात तब्बल १८८.८० कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय. हे दोन्ही चित्रपट १८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. सुरुवातीला दिलवालेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र बाजीरावला तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र समीक्षकांनी बाजीरावला पसंती दिल्यानंतर या चित्रपटाचा प्रतिसाद वाढण्यास सुरुवात झालीय