फडणवीसांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा?

भाजपामधले मुख्यमंत्रीपदाचे दोन प्रबळ दावेदार नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची आज नागपूरात भेट झाली. महाल भागातल्या गडकरींच्या घरी सुमारे अर्धा तास ही भेट झाली.

Updated: Oct 23, 2014, 12:35 PM IST
फडणवीसांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा? title=

नागपूर : भाजपामधले मुख्यमंत्रीपदाचे दोन प्रबळ दावेदार नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची आज नागपूरात भेट झाली. महाल भागातल्या गडकरींच्या घरी सुमारे अर्धा तास ही भेट झाली.
मुख्यमंत्रिपदाची राज्यात जोरदार चर्चा सुरू असतानाच झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. 

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आपण दिल्लीतच राहणार असल्याचा पुनरुच्चार गडकरींनी केलाय, हे विशेष... त्यामुळे फडणवीसांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाल्याचं मानलं जातंय... 

यापूर्वीच मी दिल्ली राहणार असल्याचे मी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

फडणवीस आज मला भेटले, ते माझे सहकारी आहेत. ते पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आहेत. त्यामुळे त्यांनी माझी त्या नात्याने भेट घेतली. मी दहा वेळा सांगितले आहे की, महाराष्ट्रात पुन्हा येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.