भाजपच्या सभेतील कचरा उचलून शिवसेनेची भाजपवर कुरघोडी

सभेनंतर मैदानातील कचरा उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार केलं जात असतानाच मुंबईतील महालक्ष्मी इथं झालेल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडं दुर्लक्षच केलं आहे. सभेनंतर मैदानात सर्वत्र कचरा पडून होता. अखेरीस रविवारी सकाळी शिवसेनेनं मैदानात स्वच्छता मोहीम राबवून भाजपवर कुरघोडी केली आहे. 

PTI | Updated: Oct 5, 2014, 03:54 PM IST
भाजपच्या सभेतील कचरा उचलून शिवसेनेची भाजपवर कुरघोडी title=

मुंबई: सभेनंतर मैदानातील कचरा उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार केलं जात असतानाच मुंबईतील महालक्ष्मी इथं झालेल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडं दुर्लक्षच केलं आहे. सभेनंतर मैदानात सर्वत्र कचरा पडून होता. अखेरीस रविवारी सकाळी शिवसेनेनं मैदानात स्वच्छता मोहीम राबवून भाजपवर कुरघोडी केली आहे. 

शनिवारी महालक्ष्मीतील रेसकोर्स मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. सभेच्या शेवटी मोदींनी मैदानात कचरा फेकू नका, मैदानात टाकलेला कचरा उचला, भारत स्वच्छ ठेवा असं आवाहन केलं होतं. मात्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हरताळ फासला. 

सभेसाठी आलेल्यांनी मैदानात पाण्याचे ग्लास, झेंडे, टोप्या, फलक टाकून दिले होते. सभा संपल्यावरही हा कचरा असाच पडून होता. रविवारी सकाळी रेसकोर्सवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या स्थानिकांनी हा प्रकार बघून नाराजी व्यक्त केली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे स्थानिक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते रेसकोर्स मैदानात दाखल झाले आणि त्यांनी मैदानात स्वच्छता मोहीम राबवत भाजपवर कुरघोडी केली.   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.