ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जळगाव शहर

जळगावच्या राजकारणातील दादा म्हणवणारे सुरेश जैन यांनी अनेकदा पक्ष बदलूनही निवडणूका मात्र जिंकल्यात. जैन यांच्या यशाची गुरुकिल्ली नेमकी काय आहे? आगामी निवडणुकीत जैन यांना कुणाचं आव्हान असणारे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणा-या जैन यांची जनतेशी नाळ राहिलीय की तुटलीयं?

Updated: Oct 7, 2014, 09:32 PM IST
 title=

जळगाव : जळगावच्या राजकारणातील दादा म्हणवणारे सुरेश जैन यांनी अनेकदा पक्ष बदलूनही निवडणूका मात्र जिंकल्यात. जैन यांच्या यशाची गुरुकिल्ली नेमकी काय आहे? आगामी निवडणुकीत जैन यांना कुणाचं आव्हान असणारे. घरकुल घोटाळ्याप्रकरणी कारागृहात असणा-या जैन यांची जनतेशी नाळ राहिलीय की तुटलीयं?

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -   
शिवसेना - सुरेशदाद जैन
भाजप - राजूमामा भोळे
काँग्रेस - राधेश्याम चौधरी
राष्ट्रवादी - मनोज चौधरी
मनसे - ललित कोल्हे    
        

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास बघायचा म्हटलं तर इथलं राजकारण हे बहुतेकदा जैन कुटुंबियांच्या भोवती फिरलेलं आढळून येतं.  सुरेश जैन यांचे वडील भिकमचंद जैन नगरपालिकेच्या राजकारणात होते त्यानंतर जैन हे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले. 

अनेकदा पक्ष बदलणारे नेते म्हणून उभ्या महाराष्ट्राला जैन परिचित आहेत, मात्र असं असलं तरी जनतेचा पाठिंबा मिळवण्यात जैन वेळोवेळी यशस्वीही ठरलेत हे नाकारून चालणार नाही. 

जैन तब्बल आठ वेळा विधानसभेवर निवडून आलेत. १९८० मध्ये जैन पहिल्यांदा आय काँग्रेसच्या तिकीटावर आमदारपदी विराजमान झाले. त्यानंतर पुढे १९८५ आणि १९९० मध्ये समाजवादी काँग्रेसच्या तिकीटावर १९९५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस तर १९९९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर जैन आमदार झाले.

२००४ मध्ये पुन्हा पक्ष बदलत जैन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. तर २००९ मध्ये पुन्हा शिवसेनेच्या तिकीटावर जैन आमदार झाले.

पूर्वी या मतदारसंघामध्ये जळगाव शहर आणि तालुक्याचा समावेश होता पुनर्ररचनेनंतर जळगाव शहर आणि ग्रामीण वेगवेगळा झाला. 

पहिल्यांदाच जैन शहर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांचा निम्मा कालखंड कारागृहात गेल्याने मतदारसंघाचा विकास खुंटलाय, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे नव्या आमदारांबाबत नागरिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला मिळताहेत. 

जैन निवडणूक लढतील की नाही अशी शंका सध्या राजकीय वर्तुळात आहे, मात्र जैन हेच या निवडणुकीत उमेदवार असतील असं सांगून या चर्चांना त्यांच्या निकटवर्तीयांनी पूर्णविराम दिलाय, मात्र सलग नऊ वेळा विजयी झालेले जैन यांच्यासमोर यावेळीही विजयाचे गणित सोपे असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.  

महापालिकेत मनसेचे १२ नगरसेवक असल्याने मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे हे देखील यावेळी शहर मतदार संघातून जैन यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.  

दम्यान, आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेस कडे आहे. ती आपल्याकडे खेचण्यासाठी राष्टवादी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादीने तशी फिल्डिंगही लावायला सुरवात केलीय.

निवडणुकीचं बिगूल वाजलं की जळगाव शहरात या पक्षातून त्या पक्षात जाण्याची जणू स्पर्धाच लागते. यावेळीही तशीच परिस्थिती आहे. 

निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलंय, तसे अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. कोण कुठल्या पक्षातर्फे निवडणूकीच्या मैदानात उतरतो, याचीच सध्या जळगावच्या वर्तुळात चर्चा रंगू लागलीय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.