ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - रत्नागिरी

राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं हे ऑडिट... मंत्रीपद मिळालेल्या उदय सामंत यांनी मतदार संघावर छाप तर पाडलीये. मात्र युतीची एकजूट त्यांच्यासाठी महागात पडू शकते. 

Updated: Oct 8, 2014, 05:32 PM IST
 title=

रत्नागिरी : राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं हे ऑडिट... मंत्रीपद मिळालेल्या उदय सामंत यांनी मतदार संघावर छाप तर पाडलीये. मात्र युतीची एकजूट त्यांच्यासाठी महागात पडू शकते. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - उदय सामंत
भाजप - सुरेंद्र माने
काँग्रेस - रमेश कीर    
राष्ट्रवादी - बशीर मुर्तजा
मनसे - डॉ. युवराज पाटील

            
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा एके काळी काँग्रेसचा हा बालेकिल्ला. १९७२ मध्ये जन संघ आणि भाजपने हा मतदारसंघ ताब्यात घेतला. मात्र २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उदय सामंत यांच्या रूपाने एक नवा आणि तरुण चेहरा दिला आणि रत्नागिरीकरानीही या चेह-याला पसंती दिली. पहिल्याच निवडणुकीत उदय सामंत सहा हजारांवर मतांनी निवडून आले. 

इथं आघाडी असली तरी काँग्रेसच्या नेत्यांचं आणि राष्ट्रवादीचं इथ फारसं जुळत नाही. तर भाजप-सेना युतीचीही तिच अवस्था आहे. २००४ आणि २००९ च्या निवडणुकीत सेनेच्या काही नेत्यांनी राजापूर मतदारसंघातील आपलं राजकीय गणित सांभाळत रत्नागिरीत राष्ट्रवादीला छुपी मदत केल्याचं अनेकजण सांगतात. आणि म्हणूनच भाजपचा उमेदवार अडचणीत आला.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये उदय सामंत यांना जनतेने दुस-यांदा पसंती दिली.

अखेरच्या टप्यात मिळालेल्या मंत्रीपदाचा उदय सामंत यांना फारसा फायदा मिळवता आला नसला तरी वातावरण निर्मितीत ते यशस्वी झालेत. सुमारे दोनशे कोटींची विकासकामे केल्याचा उदय सामंत यांचा दावा आहे.
- पाणीपुरवठा 
- रस्ते दुरूस्ती
- सांस्कृतिक रंगमंच 
- एस. टी. प्रसाधनगृह

आगामी विधानसभेची निवडणूक बघता भविष्यात अजूनही अनेक योजना राबविणार असल्याचं उदय सामंत सांगताहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला या मतदारसंघातून तब्बल 31 हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे उदय सामंत विजयाचे आडाखे बांधत असले तरी लोकसभेच्या निवडणुकीत एकदिलाने लढल्याचे फायदे आता युतीच्या नेत्यांना चांगलेच कळलेत. त्यामुळे भाजपचे माजी आमदार सुरेंद्र तथा बाळ माने यांनी नेमका याच मुद्यावर भर दिलाय. 

नुसते रस्ते डांबरीकरण म्हणजे विकास का? असा सवाल करत त्यांनी सामंतांच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उभं केलंय.

विरोधकांशी छुपी युती न करता युतीचे नेते एकदिलाने लढले तर उदय सामंत यांना आगामी निवडणुकीत विजय सोपा नसल्याचं विश्लेषक सांगताहेत.

मंत्रीपदामुळे सतत कार्यरत राहत उदय सामंत वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झालेत खरे. मात्र महायुतीतील नेते आणि कार्यकर्ते विशेषतः शिवसेनेचे नेते एकदिलाने तयारीला लागले तर उदय सामंतांपुढे ख-याअर्थी आव्हान उभे राहू शकते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.