शिवसेना रत्नागिरी मतदारसंघ करणार काबीज!

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने उभे ठाकले आहेत.

Updated: Oct 7, 2014, 04:11 PM IST
शिवसेना रत्नागिरी मतदारसंघ करणार काबीज! title=

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे यंदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे नेते उदय सामंत शिवसेनेत दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. तर गेल्या दोन निवडणुकांप्रमाणेच तिसऱ्यांदा त्यांच्याविरोधात भाजपाचे बाळ माने उभे ठाकले आहेत.

२००४ व २००९ मधील विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांनी सलग दोनवेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळविला. दुसऱ्या टर्ममध्ये शेवटच्या सत्रात सामंत यांना राष्ट्रवादीने १५ महिन्यांसाठी राज्यमंत्रिपदही दिले. त्यामुळे सामंत यांचे नेतृत्व राज्यस्तरावर झळकले.

दुसरीकडे सुरेंद्र तथा बाळ माने हे १९९९ मध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर मात्र, सामंत यांच्याकडून दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला आहे. परंतु त्या दोन्हीवेळची स्थिती वेगळी होती. आता स्वबळावरच ही निवडणूक लढविली जात असल्याने अटीतटीचा सामना होणार हे नक्की आहे.

भाजपातर्फे यंदा सलग चौथ्यांदा निवडणूक आखाड्यात असलेले बाळ माने हे यावेळी खचलेले दिसत नाहीत. आपला विजय निश्चित असल्याचा दावा माने यांनी केला आहे.

या दोघांसमोर राष्ट्रवादीकडून बशिर मुर्तझा आणि काँग्रेस कडून रमेश किर यांना उमेदवारी देण्यात आलीय. रत्नागिरी तालुक्यात ९४ पैकी ६८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. त्यामुळे हा मुद्दा सामंत यांच्या पथ्यावर पडणारा आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी सेनेत आलेल्या सामंत यांना शिवसैनिकांनी स्विकारले, तर त्यांचा विजय कठीण नाही. परंतु माने यांच्या दाव्याप्रमाणे शिवसैनिकांशी त्यांचे मनभेद नाहीत, या विधानात तथ्य असेल तर ही सामंत यांच्यासाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.