हरवलेलं १ किलो सोनं अखेर सापडलं

हरवलेलं सोनं एका महिन्याच्या आत परत मिळवून देण्यास सांगली पोलिसांना यश आलं आहे. मुंबईचे सराफ राकेश जैन यांची, एका आठवड्यापूर्वी  २२ ऑगस्ट रोजी  संगमेश्‍वर जिल्हा रत्नागिरी येथून बॅग लंपास झाली होती, या बॅगेत १ किलो सोनं होतं.

Updated: Aug 30, 2015, 11:43 PM IST
हरवलेलं १ किलो सोनं अखेर सापडलं title=

सांगली : हरवलेलं सोनं एका महिन्याच्या आत परत मिळवून देण्यास सांगली पोलिसांना यश आलं आहे. मुंबईचे सराफ राकेश जैन यांची, एका आठवड्यापूर्वी  २२ ऑगस्ट रोजी  संगमेश्‍वर जिल्हा रत्नागिरी येथून बॅग लंपास झाली होती, या बॅगेत १ किलो सोनं होतं.

ढाब्यावर खासगी ट्रॅव्हल्स बस थांबल्यानंतर, राकेश जैन खाली उतरले, पण त्यानंतर त्यांची बॅग लंपास झाली होती, ही घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरमध्ये घडली होती.

दरम्यान, चोरीचे दागिने घेऊन दोघे चोरटे सांगलीतील सराफकट्टा येथे स्कॉर्पिओ गाडीतून येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांना मिळाली होती. 

घनवट आणि पथकाने तत्काळ सराफकट्टा परिसरात सापळा रचला. गाडीतून पवार आणि डिकोळे हे दोघे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. त्यांची व गाडीची झडती घेतली. तेव्हा २७ लाख ९१ हजार ४८४ रुपयांचे एक किलो आणि ५३ ग्रॅम दागिने आणि रोख २३ हजार रुपये मिळाले. 

दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आठवड्यापूर्वी संगमेश्‍वरजवळ बसमधून बॅग चोरल्याची कबुली दिली. दागिने व रोख रक्कम आणि गाडी असा ३३ लाख १५ हजार २८४ रुपयांचा मुद्देमाल दोघांकडून उघडकीस आणला. 

आरोपी विलास रामदास पवार राहणार -सरपडोह, ता. माढा आणि हिरामण सर्जेराव डिकोळे राहणार - वडशिंगे, ता. माढा, जि. सोलापूर यांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.