गुहागरमध्ये बारा वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाला

गुहागर समुद्र किना-यावर बारा वर्षाचा मुलगा बुडाला आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुष्कराज राजाराम पाटील असं या मुलाचं नाव असून तो सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील बाहे गावचा रहिवासी आहे.

Updated: May 14, 2017, 02:24 PM IST
गुहागरमध्ये बारा वर्षाचा मुलगा समुद्रात बुडाला title=

रत्नागिरी : गुहागर समुद्र किना-यावर बारा वर्षाचा मुलगा बुडाला आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुष्कराज राजाराम पाटील असं या मुलाचं नाव असून तो सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील बाहे गावचा रहिवासी आहे.

पुष्कराज आपल्या कुटुंबियांसोबत कोकणात फिरण्यासाठी आला होता. समुद्र खवळलेला असतानाही पुष्कराज आपल्या वडील आणि बहिणींसह पोहण्यासाठी समुद्रात उतरला होता. अचानक तो बुडू लागल्याने त्याच्या वडिलांनी त्याचा हात धरुन वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र लाटेत हात सुटून तो समुद्रात फेकला गेला. स्थानिक मच्छिमार आणि पोलिसांच्या मदतीनं त्याचं शोधकार्य सुरु आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.