औरंगाबादमध्ये २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

 सुंदरवाडी शिवार येथे धक्कादायक घटना घडलेय. २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुंदरवाडी शिवारात या तरुणीवर चार जणांनी शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला.

Updated: Aug 28, 2015, 10:18 PM IST
औरंगाबादमध्ये  २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार title=

औरंगाबाद :  सुंदरवाडी शिवार येथे धक्कादायक घटना घडलेय. २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सुंदरवाडी शिवारात या तरुणीवर चार जणांनी शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला.

पीडित मुलगी आणि तिचा मित्र कँम्ब्रीज शाळेच्या मागील रोडवर गप्पा मारील असताना चार जणांचे टोळके त्या ठिकाणी आले आणि काय करताय, अशी विचारणा करीत थेट मारहाण सुरु केली. त्यात मुलगी आणि मुलाला बेदम मारहाण कऱण्यात आली आणि त्यानंतर मुलीला जवळच्या शेतात नेवून तिच्यावर बलात्कार केला.

चौघांची बलात्कार केल्याची फिर्याद मुलीनं चिखलठाणा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. याबाबत गुन्हा दाखल झालाय. पोलीस आरोपीचा शोध घेताय. ही मुलगी त्याच भागातील एका कंपनीत इंटर्नशिप करत असल्याची माहिती मिळत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.