आता कुठुनही करता येणार सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी

महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. 

Updated: Aug 15, 2016, 05:38 PM IST
आता कुठुनही करता येणार सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी title=

मुंबई : महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा झाला. 

महाराष्ट्रात काही मोजक्या ठिकाणी सायबर सेलची कार्यालयं याआधी होती पण आता सायबर गुन्ह्यांचं वाढतं प्रमाण पाहता प्रत्येक पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यात सायबर सेल कार्यालय सुरु केलं जात आहे. यात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण देऊन सायबर फोर्स तयार केली जात आहे. 

सायबर पोलीस फोर्स स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सायबर सेल कार्यालयामुळे हद्द हा विषय संपून सायबर गुन्ह्यांबाबत आता कुठूनही तक्रार देता येणार आहे.