कोकण रेल्वेसाठी ४ हजार कोटी, मार्गाचे विद्युतीकरण

कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी ४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 8, 2017, 11:59 PM IST
कोकण रेल्वेसाठी ४ हजार कोटी, मार्गाचे विद्युतीकरण title=

मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर होण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकण रेल्वेच्या विकासासाठी ४ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे अनेक कामांना चालना मिळणार आहे.

मंजूर झालेल्या निधीतून संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण, नव्या रेल्वे स्थानकांची निर्मिती, तसेच चिपळूण-कराड नवी मार्गाची उभारणी ही कामेही करण्यात येणार आहेत. यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी केली आहे. याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी यांनी दिली.

 

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण - सातारा जिल्ह्यातील कराड मार्ग झाल्यामुळे कोकणातून थेट पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेने जाणेही शक्य होणार आहे. तसेच तेथून दक्षिण रेल्वेलाही कोकण जोडले जाईल. त्यामुळे हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मंजूर निधीमुळे चिपळूण - कराड रेल्वे मार्गाचा मार्ग मोकळा झालाय.

कोकण रेल्वे मार्गाचे चार वर्षांत पूर्ण विद्युतीकरण करण्यात येणार आहे. तसेच ट्रॅकची आणि ट्रेनची संख्या वाढवण्यात येणार आहे. लूप लाइन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करतानाच कोकण रेल्वेने विद्युतीकरणावरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, चार वर्षांमध्ये संपूर्ण कोकण रेल्वेचे विद्युतीकरण केले जाणार आहे, अशी माहिती संजय गुप्ता यांनी दिली.