अजित पवार यांच्या संपत्तीत तीन पटीने वाढ

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीप्पट वाढ झाली आहे. त्यांनी निवडणूक अर्जात दिलेल्या माहितीवरून ही बाब उघड झाली आहे.

Updated: Sep 27, 2014, 04:16 PM IST
अजित पवार यांच्या संपत्तीत तीन पटीने वाढ title=

बारामती : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीप्पट वाढ झाली आहे. त्यांनी निवडणूक अर्जात दिलेल्या माहितीवरून ही बाब उघड झाली आहे.

अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याकडे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेमध्ये पाच वर्षांत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. अजित पवार यांनी २००९ मधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सादर केलेल्या मालमत्तेच्या विवरणपत्रामध्ये पती-पत्नीची मिळून १० कोटी ८० लाख रुपयांची मालमत्ता दाखविली होती.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना ही मालमत्ता ३७ कोटींहून  अधिक झाली आहे. त्यामुळे पाच वर्षांत त्यांची मालमत्ता तिपटीहून अधिक वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदार संघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जाबरोबर त्यांची मालमत्तेचे विवरण पत्र दिले असून, त्यानुसार अजित पवार व त्यांच्या पत्नीची मिळून एकूण मालमत्ता सुमारे ३७ कोटी ९३ लाख रुपयांची आहे. 

अजित पवार यांची एकूण मालमत्ता सुमारे २१ कोटी रुपये, तर सुनेत्रा पवार यांची एकूण मालमत्ता १६ कोटींपेक्षाही अधिक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.