अजित पवारांचाही पिंपरीत स्वच्छता मोहिमेत सहभाग

बारामतीमध्ये शरद पवार यांच्या सह स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या दुस-या खालसा झालेल्या पिंपरी चिंचवड या बालेकिल्यात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 

Updated: Nov 16, 2014, 10:11 PM IST
अजित पवारांचाही पिंपरीत स्वच्छता मोहिमेत सहभाग title=

पिंपरी : बारामतीमध्ये शरद पवार यांच्या सह स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या दुस-या खालसा झालेल्या पिंपरी चिंचवड या बालेकिल्यात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. 

भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळकीच्या चर्चेला त्यांनी या मोहिमेत सहभागी होत आणखी खतपाणी घातलं असल्याची चर्चा आहे.  

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्टान आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित भारत स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होत. सकाळी सात ते दहा दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या अभियानात शहरातील सर्व पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संखेन सहभाग घेतला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती अजित पवार यांच्या उपस्थितीची.

या वेळी बोलताना अजित पवार यांनी पक्षाच्या पराभवा संदर्भात अलिबाग मध्ये चिंतन बैठक घेणार असल्याच स्पष्ट केलं. अजित पवार यांनी या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर ही जोरदार टीका केली.  आघाडी सरकार असताना शेतक-यांसाठी आंदोलन करणा-यांचा स्वाभिमान आता कुठ गेला, अस म्हणत राजू शेट्टींवर तोफ डागली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.