पक्षाचा पराभव दादांच्या जिव्हारी, गद्दारांना धडा शिकवणार

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पराभवाची राष्ट्रवादी काँग्रेसनं गंभीर दखल घेतलीय. 

Updated: Mar 22, 2017, 06:33 PM IST
पक्षाचा पराभव दादांच्या जिव्हारी, गद्दारांना धडा शिकवणार  title=

बीड : बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पराभवाची राष्ट्रवादी काँग्रेसनं गंभीर दखल घेतलीय. 

माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय.  यासंदर्भात अजित पवारांच्या नावानं प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलंय. 

जिल्ह्यातला पक्ष कार्यकर्ता पक्षवाढीसाठी तळमळीनं झटत असताना आणि लोकमान्यतेची मोहर उमटलेली असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा झालेला पराभव कार्यकर्ते व मतदारांच्या जिव्हारी लागल्याचं त्यांनी नमूद केलंय.

या संदर्भात पक्ष भावना अत्यंत तीव्र आहेत. पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रीपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल, असंही पत्रकार म्हटलंय. 

अशा पक्षविरोधी कारवाया सहन करणार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. मात्र सोलापूरमधल्या बंडखोरीबाबत या पत्रकात मौन बाळगण्यात आलंय.