अमरावतीत चिमुकल्यांचं कृषीविश्व

चिमुकल्यांनी साकारलं कृषीविश्व. पारंपरिक शेतीसोबतच मिश्रशेतीचा प्रयोग करत बच्चेकंपनीनं समजावलं सेंद्रिय शेतीचं महत्त्व.

Updated: Jan 17, 2015, 09:44 PM IST
अमरावतीत चिमुकल्यांचं कृषीविश्व title=

अमरावती : चिमुकल्यांनी साकारलं कृषीविश्व. पारंपरिक शेतीसोबतच मिश्रशेतीचा प्रयोग करत बच्चेकंपनीनं समजावलं सेंद्रिय शेतीचं महत्त्व.

जात्यावर दळण आणि पारंपरिक वेशात झुकणा भाकरीचा आस्वाद घेणारे बालशेतकरी. अशी दृष्यं अमरावतीच्या अंजनगावमधल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची पाहायला मिळतात. त्यांनी सादर केलेलं प्रदर्शन सर्वांनाच प्रेरणा देते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतक-यांचं प्रबोधन व्हावं या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.

पाणी अडवा, पाणी जिरवा या विविध विषयांचं सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून केलं. आधुनिक शेती आणि नव्या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशानं हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याचं शिक्षकांनी सांगितलंय. 

तीन दिवसीय प्रदर्शनाला शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.. अशाया प्रदर्शनातून शेतक-यांमध्ये शेतीची बीजे रोवण्यास मदत होईल यांत शंका नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.