कुबड्या लावून सचिनचा मुलगा जस्टीनच्या कॉन्सर्टला

सचिनचा मुलगा अर्जुनने देखील जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला कुबड्या लावून नेम धरला आणि कॉन्सर्टचा आनंद घेतला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 11, 2017, 02:49 PM IST
कुबड्या लावून सचिनचा मुलगा जस्टीनच्या कॉन्सर्टला title=

नवी मुंबई : सचिनचा मुलगा अर्जुनने देखील जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला कुबड्या लावून नेम धरला आणि कॉन्सर्टचा आनंद घेतला. जस्टिन बिबरची म्युझिक कॉन्सर्ट बुधवारी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर होती. जस्टीनच्या या कॉन्सर्टला सिनेमा आणि क्रिकेट जगतातील बडी मंडळी उपस्थित होती. 

जस्टीन बिबरच्या या कार्यक्रमात गावाकडे तमाशाला संध्याकाळपासून घोंगडं टाकून जागा सांभाळतात, तसे फॅन्स दिवसभर कॉन्सर्टकडे डोळे लावून होते, यात दिवसभरात ५० चाहते बेशुद्ध झाले होते. पण क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन देखील जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला उपस्थित होता.

अर्जुनच्या पायाला दुखापत झाली आहे, दुखापतीचं कारण माहित नाही, पण अर्जुन कुबड्या लावून जस्टीन बिबरच्या कार्यक्रमाला उपस्थित होता, यावरून जस्टीन बिबरने क्रेझ कळते.

मात्र अर्जुनच्या पायाला दुखापत झाली हे ऐकून सचिन तेंडुलकरचे फॅन्सही निश्चितच हळहळतील.