अपघातानंतर गावकऱ्यांनी रोखला मुंबई-नाशिक हायवे, प्रशासन वठणीवर

 मुंबई आग्रा हायवेवर कंटेनरनं दुचाकी स्वाराला चिरडल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केला. मुंबई नाशिक हायवेवर आसनगावजवळ ही घटना घडली. त्य़ानंतर तब्बल चार तास दोन्हीकडची वाहतूक गावक-यांनी रोखून धरली होती.

Updated: Nov 27, 2014, 05:34 PM IST
अपघातानंतर गावकऱ्यांनी रोखला मुंबई-नाशिक हायवे, प्रशासन वठणीवर title=

>आसनगाव : मुंबई आग्रा हायवेवर कंटेनरनं दुचाकी स्वाराला चिरडल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केला. मुंबई नाशिक हायवेवर आसनगावजवळ ही घटना घडली. त्य़ानंतर तब्बल चार तास दोन्हीकडची वाहतूक गावक-यांनी रोखून धरली होती.

गावकऱ्यांनी अपघातात मृत्यूमुखी झालेल्या तरुणाचा मृतदेहही उचलू दिला नाही. गावकऱ्यांसाठी अंडरग्राऊंड रोड आणि सर्व्हिस रोडची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतेय. त्याचं काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. तब्बल चार तास हा गोंधळ सुरू होता.

सर्वपक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधींची उद्याच बैठक घेऊन काम मार्गी लावण्याचं आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थांचं समाधान झालं नाही. अखेर जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान, कंटेनरचा ड्रायव्हर अपघातानंतर फरार झाला असून त्याला तातडीनं अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.