औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर बदलणार : उद्धव ठाकरे

दिल्लीतल्या औरंगजेब रस्त्याचं नाव बदलून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असे करण्यात आले आहे. त्याचं आपण स्वागत करत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आपलं सरकारही लवकरच औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर असं करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यानिमित्तानं सांगितलं. 

Updated: Aug 30, 2015, 01:17 PM IST
औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर बदलणार : उद्धव ठाकरे title=

ठाणे : दिल्लीतल्या औरंगजेब रस्त्याचं नाव बदलून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम असे करण्यात आले आहे. त्याचं आपण स्वागत करत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आपलं सरकारही लवकरच औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर असं करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यानिमित्तानं सांगितलं. 

उत्सव हे उत्सवाप्रमाणेच साजरे झाले पाहिजेत. ते तसे करता येत नसतील तर स्वातंत्र्याचा फायदा काय असा सवालही त्यांनी यावेळी केला. ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये ज्येष्ठ शिवसेना नेते सतीश प्रधान यांच्या पंच्याहत्तरी निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

हार्दिक पटेलला उद्धव यांचा सल्ला

गुजरातमधले पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल बाळासाहेब ठाकरे यांना आदर्श मानत असतील, तर बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखंच हार्दिक पटेल यांनी वागावं असा उपदेश, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

ठाण्यातल्या ज्युपिटर रूग्णालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या नेत्रालय विभागाचं उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी उद्दव यांनी हार्दिक यांना हा सल्ला दिला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.