प्रेमविवाहाला विरोध; दोन्ही कुटुंबांना जातपंचायतीची क्रूर वागणूक

औरंगाबाद इथंही एक वाळीत प्रकरण उघडकीस आलंय. एका दाम्पत्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाला टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या दाम्पत्याने प्रेमविवाह केल्यानं त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आलंय.

Updated: Jan 9, 2015, 12:11 PM IST
प्रेमविवाहाला विरोध; दोन्ही कुटुंबांना जातपंचायतीची क्रूर वागणूक title=

औरंगाबाद : औरंगाबाद इथंही एक वाळीत प्रकरण उघडकीस आलंय. एका दाम्पत्याबरोबरच संपूर्ण कुटुंबाला टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या दाम्पत्याने प्रेमविवाह केल्यानं त्यांना समाजातून बहिष्कृत करण्यात आलंय.

पीडित मुलगा आणि मुलगी कंजारभाट समाजातील आहेत. एकात्र गोत्राचे असल्यानं प्रेमविवाह चुकीचा असल्याचं सांगत कंजारभाट जातपंचायतीनं त्यांना वाळीत टाकलंय. 'एकाच गोत्रातला मुलगा आणि मुलगी एकमेकांशी विवाह करू शकत नाही... त्यामुळे, संस्कृती नष्ट होते' असं हास्यास्पद कारण या समाजानं त्यांना दिलं. 

जात पंचायतीत परत घेण्याच्या मोबदल्यात या दाम्पत्याकडून पंचायतीनं दंडाच्या रूपात आत्तापर्यंत १ लाख ७० हजार रुपयेही उकळलेत. पण, एवढ्यावरच त्यांचा पैशांचा हव्यास संपला नाही... आणि हा बहिष्कार मागे घेण्यात आला नाही.

इतकंच नाही, तर या दाम्पत्याला आणि त्यांच्या दोन्ही कुटुंबीयांना कोणत्याही लग्न समारंभात, कार्यक्रमात समाविष्ट केलं जाऊ नये, असा फतवाही या जातपंचायतीनं काढला... एवढं कमी की काय, पीडित महिलेच्या भावाच्या मृत्यूनंतरही समाजाच्या स्मशानभूमीतही त्यांना येऊ दिलं गेलं नाही... 

इतकी क्रूर वागणूक या जातपंचायतीनं या जोडप्याला दिल्यानंतर अखेर सगळ्या प्रकाराला कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या दाम्पत्याने सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दार ठोठावले. 

त्यानंतर  याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.