पाचपुतेंनी घड्याळ काढलं, 'कमळ' की 'अपक्ष' निर्णय लवकरच

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनराव पाचपुते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पाचपुते पक्षात नाराज होते. काल त्यांनी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यावरही आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप केला होता.   

Updated: Aug 15, 2014, 07:31 PM IST
पाचपुतेंनी घड्याळ काढलं, 'कमळ' की 'अपक्ष' निर्णय लवकरच title=

श्रीगोंदा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बबनराव पाचपुते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. पाचपुते पक्षात नाराज होते. काल त्यांनी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्यावरही आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप केला होता.   

बबनराव पाचपुते हे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकवेळी नव्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेत.  

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव पाचपुते यांनी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर शिविगाळ केल्याचा आरोप केला होता. मात्र मधुकररावांनी हे आरोप फेटाळले आहेत. माझं कॉल रेकॉर्ड चेक करा.. त्यात शिव्या आढळल्या तर सांगाल ती शिक्षा भोगेन असं आव्हानच पिचडांनी दिलेत.

भाजपमध्ये जाणार की अपक्ष?

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते बबनराव पाचपुते हे १८ ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र पाचपुते यांनी त्याचा इन्कार केला आहे. भाजपचे नेते आपल्या संपर्कात असल्याचे कबूल करताना त्यांनी अद्याप आपला कोणताही निर्णय झालेला नाही, असं स्पष्ट केलं. त्यामुळं पाचपुते भाजपमध्ये गेले नाहीत तर श्रीगोंदा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवू शकतात, असंही त्यांच्या निकवर्तींयांकडून सांगण्यात येत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.