खाक्या वर्दीतली 'माय'!

 खाक्या वर्दीतल्या 'माणुसकी'चा अनुभव डहाणूमध्ये एक तान्हुली घेतेय. 

Updated: Sep 15, 2015, 10:57 PM IST
खाक्या वर्दीतली 'माय'!  title=

हर्षद पाटील, पालघर : खाक्या वर्दीतल्या 'माणुसकी'चा अनुभव डहाणूमध्ये एक तान्हुली घेतेय. 

अतिशय गोंडस अशा या तान्हुलीला बेवारस अवस्थेत निर्दयीपणे डहाणू कोर्टासमोरच्या कब्रस्तानाजवळ कुणीतरी फेकून दिलं होतं. सध्या तिच्यावर डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत... आणि या बाळाची काळजी घेतेय खाकी वर्दीतली माय...

महिला पोलीस शिपाई प्रियंका देशमुख आणि महिला पोलीस नाईक व्ही. एस. राऊळ या अत्यंत मायेनं आणि आपुलकीनं या चिमुकलीचा सांभाळ करत आहेत.  

आता या छोट्या बाहुलीला रस्त्यावर कुणी फेकलं, याचा शोध सुरू आहे. मुलगी झाली म्हणून या चिमुकलीला फेकलं? की अनैतिक संबंधांतून तिचा जन्म झाला म्हणून या तान्हुलीवर ही वेळ आली? तिचे जन्मदाते सापडतील की नाही, ते माहित नाही... पण यानिमित्तानं खाकीतली मायमाऊली जगासमोर आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.