बाईकच्या धडकेत बाईकस्वारासह पादचाऱ्याचा नाहक बळी

वाहतुकीचे नियम न पाळल्यानं चंद्रपुरात एका बाईकस्वारासह रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा नाहक बळी गेलाय. 

Updated: Nov 7, 2016, 08:19 AM IST
बाईकच्या धडकेत बाईकस्वारासह पादचाऱ्याचा नाहक बळी title=

चंद्रपूर : वाहतुकीचे नियम न पाळल्यानं चंद्रपुरात एका बाईकस्वारासह रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीचा नाहक बळी गेलाय. 

शहरातील प्रियदर्शनी चौकातील उड्डाण पुलावर ही घटना घडलीय. वाहतुकीच्या दिव्यांकडे लक्ष न देता भरधाव वेगानं बाईक घेऊन जाणाऱ्या बाईकस्वाराचा गाडीवरील ताबा सुटला... आणि हा अपघात घडला. 

तुळशीदास खराटे (४३ वर्ष) आणि सुल्तान थारिया (२० वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.