सीसीटीव्ही: चोरट्यांनी केली चंदनाची चोरी, कालिका मंदिरातील प्रकार

नाशिक शहरातील चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसून चोरट्यांनी आता मंदिरांनाही लक्ष करायला सुरवात केलीय. मुंबईनाका परिसरातील कालिकामाता मंदिराच्या आवारातील चंदनाच्या झाडाची पहाटे साडेपाच वाजता चोरी केलीय. 

Updated: Jun 3, 2015, 12:00 PM IST
सीसीटीव्ही: चोरट्यांनी केली चंदनाची चोरी, कालिका मंदिरातील प्रकार title=

नाशिक: नाशिक शहरातील चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसून चोरट्यांनी आता मंदिरांनाही लक्ष करायला सुरवात केलीय. मुंबईनाका परिसरातील कालिकामाता मंदिराच्या आवारातील चंदनाच्या झाडाची पहाटे साडेपाच वाजता चोरी केलीय. 

चंदन वृक्षाची तोड आणि चंदन चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पहाटे मंदिरातील काकड आरती सुरु असताना चोरटे मंदिराच्या आवारात घुसले. त्यांनी मंदिराच्या समोरील दहा बारा फुट उंचीच्या वृक्षाची तोड करायला सुरवात केली. झाड पडल्याचा आवाज अल्यानं वॉचमन आरती सोडून बाहेर आले. 

मात्र चोरटे धारधार कटर घेऊन त्यांच्या मागे धावले. दहा ते पंधरा मिनीटं कालिका मातेच्या मंदिरात हा प्रकार सुरु होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तापस सुरु आहे. 

पाहा हे सीसीटीव्ही फुटेज : 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.