व्हिडिओ: रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत चार लाखांचा दरोडा

पुण्याजवळ वाघोली इथं एका मद्यधुंद तरुणानं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत चार लाखांचा दरोडा टाकलाय. तसंच त्यानं बॅंक मॅनेजरला ओलीस ठेवून तो पसार झाला. 

Updated: Jul 16, 2015, 04:24 PM IST
व्हिडिओ: रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत चार लाखांचा दरोडा  title=

पुणे: पुण्याजवळ वाघोली इथं एका मद्यधुंद तरुणानं रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बँकेत चार लाखांचा दरोडा टाकलाय. तसंच त्यानं बॅंक मॅनेजरला ओलीस ठेवून तो पसार झाला. 

अशोक सहकारी बॅंकेत काल हा प्रकार घडलाय... हा सगळा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. दुपारी हा युवक बँकेत आला आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कॅशियरला बॅगेत पैसे घेऊन येण्यास सांगितलं. रिव्हॉल्व्हर पाहून हे ग्राहक आणि कर्मचारी पळून गेले. त्यावेळी बॅंकेत दोन ग्राहक होते. पैशांची बॅग हाती आल्यावर ब्रँच मॅनेजर युवराज रोकडे यांना गनपॉइंटवर ठेवून तो बाहेर पडला. 

रोकडे यांना बाईक चालवायला सांगून तो मागे बसला. पुणे-सोलापूर रस्त्यावर यवतजवळ बाईकमधलं पेट्रोल संपल्यामुळं त्यानं रोकडेंना तिथंच सोडलं आणि टेंपोतून पोबारा केला. हा चोरटा स्थानिकच असल्याचा अंदाज आहे. पोलीस त्याचा शोध घेतायत तसंच त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का, याचाही तपास सुरू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.