सिडकोच्या 'स्वप्नपूर्ती'ची सोडत जाहीर, घरांचा ताबा कधी मिळणार?

नवी मुंबईतील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पाची सोडत आज पार पडली. २०१६ पर्यंत या घरांचा ताबा मिळणार आहे.

Updated: Nov 29, 2014, 08:01 PM IST
सिडकोच्या 'स्वप्नपूर्ती'ची सोडत जाहीर, घरांचा ताबा कधी मिळणार?  title=

नवी मुंबई : नवी मुंबईतील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पाची सोडत आज पार पडली. २०१६ पर्यंत या घरांचा ताबा मिळणार आहे.

सिडकोने खारघर येथे उभारलेल्या स्वप्नपूर्ति गृनिर्माण प्रकल्पात आर्थिक दुर्बल घटकांसाठी ७०४ तर अल्प उत्पन्न गटासाठी २४५० घरांची उभारणी केलीय. यामध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी ४८ हजार ११९ अर्ज दाखल झाले होते. तर दुसरा गट अल्पउत्पन्न गटासाठी ३८  हजार ७३५ आर्ज दाखल झाले होते. 

या दोन्ही गटात आरक्षण देण्यात आलेय. या घरांची सोडत संगणक पद्धतीने झाली. सामन्याच्या निवारा मिळावा यासाठी सिडकोने उभारलेल्या या गृहनिर्माण प्रकल्पात  लागल्याने घर लागलेल्या अर्जदारांनी आंनद व्यक्त केला. तर २०१६ पर्यंत या स्वप्नपूर्तीच्या घरांचे वितरण होणार असून. लवकरच सिडकोच्या नव्या प्रकल्पाची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती सिडकोच्या संचालकांनी दिली.

निकाल पाहण्यासाठी http://www.cidco.maharashtra.gov.in/Book_Housing_Scheme.aspx या संकेतस्थळाला भेट द्या.

या ठिकाणी यादी पाहा http://www.cidco.maharashtra.gov.in/pdf/SWAPNPURTI/EWS/EWS_GEN.pdf

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.