मराठी सक्तीची नेमाडेंची भूमिका योग्यच - राज ठाकरे

 शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, ही ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

Updated: Nov 29, 2014, 04:41 PM IST
मराठी सक्तीची नेमाडेंची  भूमिका योग्यच - राज ठाकरे title=

नाशिक : शालेय शिक्षणामध्ये मराठी सक्तीची करावी, ही ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

राज ठाकरे नाशिकमधील पत्रकारपरिषदेत बोलत होते. मराठी माध्यमाच्या शाळांतून उत्कृष्ट दर्जाचे इंग्रजी शिकवले गेल्यास, पालक आपल्या मुलांना नक्कीच मराठी शाळांमध्ये पाठवतील. मात्र, यामधून सरसकटपणे इंग्रजी शाळा बंद कराव्यात, असा चुकीचा अर्थ काढला जाणे अयोग्य असल्याचे राज यांनी म्हटले.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मातृभाषा नीट आलीच पाहिजे. एवढेच नव्हे तर, आपल्याला स्वप्न सुद्धा मराठीत पडली पाहिजेत. आधी घरात मराठी ठीक करा. शेतकऱ्यांची मुले मुख्यमंत्री होतात, पण मराठीसाठी काय करतात? कनार्टकात नाही चालत असे. मग, महाराष्ट्रात मराठीपेक्षा इंग्रजीला प्राधान्य का, असा सवाल करीत नेमाडे यांनी इंग्रजी शाळा बंद कराव्यात, असे मत व्यक्त केले होते.

दरम्यान, मराठी शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी भाषा शिकवल्यास मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न आपोआप निकाली निघेल, असे मत राज यांनी व्यक्त केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.