मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लातुरात अपघात

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बालंबाल बचावले, लातुरात मुख्यमंत्री फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 25, 2017, 12:36 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लातुरात अपघात title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर  : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बालंबाल बचावले, लातुरात मुख्यमंत्री फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना, हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं, या अपघातात मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला खरचटलं आहे.  

या हेलिकॉप्टरचे पंख जागीच निखळले आहेत, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून मोठा धूर निघतोय. जवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा जमा झाला आहे. बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपण आणि आपली टीम सुरक्षित असल्याचं ट्ववीट केलं आहे. 

जवळचं १०० मीटरवर एक ट्रान्सफॉर्मर देखील होते, पण सुदैवाने मुख्यमंत्री थोडक्यात बचावले.