चेक नाक्यावर खिसे भरण्यासाठी नाकाच केला बंद

गोंदियाच्या सीमेवर असलेला वाहन तपासणी नाक्यामुळे सरकारचं लाखोंचं नुकसान होतंय.

Updated: May 12, 2015, 03:12 PM IST
चेक नाक्यावर खिसे भरण्यासाठी नाकाच केला बंद title=

गोंदिया : गोंदियाच्या सीमेवर असलेला वाहन तपासणी नाक्यामुळे सरकारचं लाखोंचं नुकसान होतंय.

महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेला गोंदियातला महत्त्वपूर्ण तपासणी नाका... एरव्ही देवरीचा हा वाहन तपासणी नाका प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गजबजलेला असतो. मात्र याठिकाणी सध्या स्मशानशांतता पहायला मिळते... कारण काय तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हा नाका बंद असल्याचं सांगण्यात येतंय. 

या महामार्गावरुन दररोज तब्बल दोन हजार जड वाहनं ये-जा करतात. मात्र, इथले अधिकारी आपले खिसे भरण्यासाठी हा नाका तात्पुरता सुरु करत असल्याचा आरोप नागरिक करतायत. त्यामुळे, शासनाचा लाखोंचा महसूल बुडतोय.  

'सद्भाव इंजीनिअरिंग लिमिटेड'कडे या तपासणी नाक्याचं काम देण्यात आलं होतं... त्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या होत्या. मात्र, या शेतकऱ्यांना अद्याप कुठलाही मोबदला मिळालेला नाही. 

याप्रकरणी आरटीओ अधिकारी कॅमेऱ्यासमोर येण्यास तयार नसून यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतेय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.