धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाविरोधात अखेर गुन्हा दाखल

धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या एका अज्ञात युवकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated: Aug 11, 2016, 10:07 PM IST
धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाविरोधात अखेर गुन्हा दाखल  title=

नाशिक : धरणावर स्टंटबाजी करणाऱ्या एका अज्ञात युवकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातल्या नांदूरमाध्यमेश्वर धरणावर स्टंटबाजी केलेल्या तरुणाची बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्यानंतर युवकाविरोधात तक्रार दाखल करुन त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झी २४ तासाने याबाबतचं वृत्त दाखवलं होते. निफाड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झी मीडियाने धरणावर सेल्फी आणि स्टंटची ती बातमी दाखवल्यानंतर, संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. केंद्र पातळीवरही त्याची दखल घेतली गेली होती. त्यानुसार आता धरणावर मद्यपान तसेच स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.