शेतकऱ्यांचा 'मार्चएण्ड', मुख्यमंत्र्याचं 'पिंपरी लाईव्ह'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात दौरा करून प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि गावकऱ्यांशी संवाद साधत रात्री पिंपरी या गावातच शेतकऱ्याकडे मुक्काम ठोकला.

Updated: Mar 4, 2015, 01:06 PM IST
शेतकऱ्यांचा 'मार्चएण्ड', मुख्यमंत्र्याचं 'पिंपरी लाईव्ह' title=

यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यात दौरा केला,  प्रगतीशील शेतकऱ्यांची भेट घेतली, आणि  रात्री पिंपरी या गावातच शेतकऱ्याकडे मुक्काम ठोकला. 

यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

निदाळ शेतकरी राजाची 'मर-मर' तरी थांबवा
शेतकऱ्यांची मार्चअखेरजवळ आल्यानं कर्ज फेडण्याची धावपळ सुरू झाले आहे. वेळेवर वार्षिक मुदतीचं पिक कर्ज भरलं तर जास्तीचं व्याज लागणार नाही, असं शेतकऱ्यांचं गणित आहे.

शेतकऱ्यांचं हे गणित आणखी जुळून आलं असतं, जेव्हा त्याला थोडीथोडकी मदत सरकारकडून झाली असती, मात्र शेतकरी बँकेचा पैसा परत करण्यासाठी ओढाताण करतोय, तरीही मायबाप शेतकऱ्याकडे सरकार दरबार आ वासून पाहतोय.

गांधी घराण्यातले पुढारी गरीबांच्या घरी जाऊन स्टंट करतात...मात्र

अशातच मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थोडी थोडकी मदत मिळवून देतील असं वाटत असतांना, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या घरी त्याच्या झोपडीत मुक्काम ठोकून, परिस्थिती लक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे. या आधीही परिस्थिती गंभीर होती, तरी आणखी हे प्रयोग का?, आतापर्यंत गांधी घराण्यातील लोकांनीच असे झोपडीत जाऊन जेवण्याचे प्रयोग केले आहेत, तसाच प्रयोग गांधी घराण्यावर टीका करणाऱ्या फडणवीसांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

भू-संपादन विधेयकामुळे शेतकऱ्यांमध्ये या आधीच मोदी सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. 

भाबळ्या शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षा
मुख्यमंत्री शेतकऱ्यांना पॅकेज ची घोषणा करतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र आणखी थोडा वेळ द्या, सरकार वर विश्वास ठेवा, परिवर्तन होईल.

 हे सरकार आपले आहे, गेल्या १५ वर्षात विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्या, निराश होऊ नका अशी साद मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना घातली. 

यवतमाळमध्ये आढावा बैठक घेवून मुख्यमंत्र्यांनी रातचांदणा, घोडखिंडी व पिंपरी यागावांना भेटी दिल्या रातचांदणा येथे पंतप्रधान पॅकेजमधून समृद्धी साधलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केली.

मुख्यमंत्र्यांनी अन्य शेतकऱ्यांना त्याचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला सोबतच सरकार आगामी काळात या भागात कापूस आणि सोयाबीन वर प्रक्रिया उद्योग सुरु करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.