मानखुर्द येथे केमिकल गोडाऊनला भीषण आग

मानखुर्द येथे मंडल भागात एका केमिकल गोडाउनला भीषण आग लागली आहे. मानखुर्द येथील इंदिरा नगर विभाग येथे आग लागली असून हा दाट वस्तीचा भाग आहे. ही आग लेव्हल तीनची असून अग्निशमनाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल केल्या आहेत. 

Updated: May 24, 2016, 04:44 PM IST
मानखुर्द येथे केमिकल गोडाऊनला भीषण आग title=

मुंबई : मानखुर्द येथे मंडल भागात एका केमिकल गोडाउनला भीषण आग लागली आहे. मानखुर्द येथील इंदिरा नगर विभाग येथे आग लागली असून हा दाट वस्तीचा भाग आहे. ही आग लेव्हल तीनची असून अग्निशमनाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल केल्या आहेत. 

आगीने रौद्र रुप धारण केले असून अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करित आहेत. लवकरच आगीवर नियंत्रण मिळवू असे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले.