नाशिकच्या गोदावरी नदीला पूर

एकाच दिवसातल्या विक्रामी पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. दारणा धरणामधून 3000 क्युसेक्स,पालखेड डाव्या कालव्यातून 600 क्युसेक्स आणि कादवामधून 5000 क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय.

Updated: Aug 1, 2018, 05:35 PM IST
नाशिकच्या गोदावरी नदीला पूर title=

नाशिक : एकाच दिवसातल्या विक्रामी पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. दारणा धरणामधून 3000 क्युसेक्स,पालखेड डाव्या कालव्यातून 600 क्युसेक्स आणि कादवामधून 5000 क्युसेक्स विसर्ग करण्यात येतोय.

गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात अठराशे मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे धरण क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे दीडशे ते दोनशे मीमी पावसाची नोंद झाली आहे. नाशिकच्या गोदावरीत अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे.  हवामान खात्याने आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आलाय.