करार करा आणि मोफत लाईट घ्या : ऊर्जामंत्री बावनकुळे

ई.ई.एस.एल.कंपनी सोबत करार करा आणि फुकट लाईट बसवा, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे.

Updated: Dec 3, 2015, 11:17 PM IST
करार करा आणि मोफत लाईट घ्या : ऊर्जामंत्री बावनकुळे   title=

 औरंगाबाद : ई.ई.एस.एल.कंपनी सोबत करार करा आणि फुकट लाईट बसवा, असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे.

बावणकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज औरंगाबाद येथे एलईडी लाईट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ईईएसएलसोबत करार करुन रस्त्यावर फुकट लाईट बसवून घेण्याचं आवाहन ऊर्जामंत्री यांनी राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे. 

एलईडीमुळे विजेची ५० टक्के बचत होते. त्यामुळे महापालिका आणि नगरपालिकांनी अशा प्रकारचे लाईट वापरल्यास विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल.   शेतकऱ्यांसाठी लवकरच ४० ते ५० टक्के विजेची बचत करणाऱ्या विज पंप वाटपाचा कार्यक्रम औरंगबादमध्ये घेणार असल्याचही बावनकुळे यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.