बुलडाण्यात फुंडकर विरुद्ध सानंदा... प्रतिष्ठेची लढत!

जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये २७ नोव्हेंबरला निवडणूक होतेय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण ११ नगरपालिका आणि २ नगर पंचायत आहेत. यापैंकी ९ नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यात बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर या नगरपालिकांचा समावेश आहे.

Updated: Oct 28, 2016, 08:23 PM IST
बुलडाण्यात फुंडकर विरुद्ध सानंदा... प्रतिष्ठेची लढत! title=

संतोष लोखंडे, बुलढाणा : जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये २७ नोव्हेंबरला निवडणूक होतेय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण ११ नगरपालिका आणि २ नगर पंचायत आहेत. यापैंकी ९ नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यात बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर या नगरपालिकांचा समावेश आहे.

त्यापैंकी बुलढाणा आणि देऊळगाव राजा नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. चिखली आणि जळगाव जामोद नगर पालिकेवर भाजप-सेनेची,  खामगाव पालिकेवर आघाडीची तर मेहकर, शेगाव, मलकापूर, नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. 

या सर्व नगरपालिकांमध्ये खामगावच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष असेल. कारण कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर आणि काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलीय. चिखलीमध्ये वर्षभरापूर्वी भाजपनं खेळलेल्या खेळीमुळे सत्ता मिळवता आली. पण आता त्यांच्यापुढे सत्ता टिकवण्याचं आव्हान असेल तर नव्यानंच जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आमदार राहुल बोन्द्रे यांच्यासमोर गेलेली सत्ता परत मिळवण्याचं आव्हान असेल. 

नगरपालिका निवडणुकीत आता शिवसेना-भाजपची युती झालीय. आता बुलढाण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी बाजी मारतं की, युतीचा वर्चस्व निर्माण करते ते येत्या 28 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.