मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीनं आतापर्यंत नाशिकमधल्या ८ ते १० मुलींची खरेदी विक्री केली आहे. 

Updated: May 26, 2016, 04:59 PM IST
मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश title=

नाशिक : मुलींची खरेदी विक्री करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीनं आतापर्यंत नाशिकमधल्या ८ ते १० मुलींची खरेदी विक्री केली आहे. 

शहरात यांचे अनेक एजंट असल्याचा संशयही व्यक्त केला जातो आहे. यात दलाल महिलेसह राजस्थानच्या ३ रहिवाशांना अटक करण्यात आली आहे. 

फसवणूक झालेली एक मुलगी स्वत:ची सुटका करुन नाशिकमध्ये आली, यावरून श्रीमंत व्यक्तीशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली दलाल अल्पवयीन मुलींची फसवणूक होत असल्याचं समोर आलं.

सर्व प्रकाराची माहिती या मुलीने पंचवटी पोलीस स्थानकात दिली. यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजस्थानमधल्या टोळीच्या म्होरक्यांशी संवाद साधला आणि मंगळवारी या टोळीतील काहीजणांना जेरबंद केलं.