यावल येथे विद्यार्थीनीवर गॅंगरेप

यावल येथील विद्यार्थीनीवर तीन नराधमांनी  बलात्कार केल्याची घटना घडलीय. यावल पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Feb 11, 2016, 08:49 AM IST
यावल येथे विद्यार्थीनीवर गॅंगरेप  title=

जळगाव : यावल येथील विद्यार्थीनीवर तीन नराधमांनी  बलात्कार केल्याची घटना घडलीय. यावल पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आरोपीला पोलिसांनी अटक केलीय.

२८ तारखेला पीडित विद्यार्थीनी शाळेत जात असतांना संशयीत दत्तू साळवे तसच संदीप हिरवाळे यांनी रस्ता अडवून जबरदस्तीने मोटार सायकलवर बसवून पळवून नेले. एका निर्जन ठिकाणी बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

याबाबत वाच्चता केलीस किंवा कोणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी या तिघांनी पीडित मुलीला दिली होती. पीडित मुलीने आईलाला सर्व प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. या प्रकरणी संदीप हिरवाळे या आरोपीला अटक केलीय तर दत्तू साळवेसह एक अनोळखी तरुण फरार आहे. दरम्यान तिघांनी पीडित मुलीचे फोटोही काढले असल्याने या मुलीने सांगितले.