पूर्ण सत्ता द्या, कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्माण करतो : राज

महानगरपालिकेची पूर्ण सत्ता द्या, कल्याण- डोंबिवलीचे नवनिर्माण करतो, असे डोंबिवलीतल्या जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला साकडं घातले. नाशिकप्रमाणं केडीएमसीत कायापालट करण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिले.

Updated: Oct 24, 2015, 07:32 AM IST
पूर्ण सत्ता द्या, कल्याण-डोंबिवलीचे नवनिर्माण करतो : राज title=

डोंबिवली : महानगरपालिकेची पूर्ण सत्ता द्या, कल्याण- डोंबिवलीचे नवनिर्माण करतो, असे डोंबिवलीतल्या जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचं जनतेला साकडं घातले. नाशिकप्रमाणं केडीएमसीत कायापालट करण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिले.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवड़णुकीच्या प्रचारसभेत मनसे राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचा चांगला समाचार घेतला. दरम्यान, पटत नसेल तर डिव्होर्स घ्या, असा टोमणा राज ठाकरे यांनी शिवसेनेला हाणला. तर दुसरीकडे ७ हजार कोटींचं पॅकेज जाहीर करत मुख्यमंत्र्यांचीही खिल्ली उडवली. 

अधिक वाचा : राज ठाकरेंनी डागली मोदींवर तोफ

भाजपनं कल्याण-डोंबिवलीसाठी जाहीर केलेलं साडे सहा हजार कोटींचं पॅकेज म्हणजे निव्वळ फसवेगिरी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर विचारांचं सोनं लुटणाऱ्या शिवसेनेनं केवळ महापालिका लुटल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपसोबत पटत नसेल तर शिवसेनेनं घटस्फोट घ्यावा, असा सल्ला शिवसेनेला दिलाय. पूर्ण सत्ता दिली तर कल्याण-डोंबिवलीचं नवनिर्माण करून दाखवतो, असं असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिेले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.