असा असू शकतो का याकूब मेमनचा फाशीचा दिवस?

मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठांनीही फेटाळली आहे. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली. त्यामुळे याकूब मेमनच्या फाशीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

Updated: Jul 29, 2015, 11:22 PM IST
असा असू शकतो का याकूब मेमनचा फाशीचा दिवस? title=

नागपूर : मुंबईतील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठांनीही फेटाळली आहे. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दयेची याचिका फेटाळली. त्यामुळे याकूब मेमनच्या फाशीवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. 

याकूब मेमनला उद्या सकाळी सात वाजता नागपूरच्या सेंट्रजेलमध्ये फाशी देण्यात येणार आहे. ही बातमी कळताच याकूबचा भाऊ सुलेमान याकूबला फेटण्यासाठी नागपूर जेलमध्ये गेला.

मुंबईतील १९९३  मधील साखळी बॉम्बस्फोट हे भारतातले पहिले महाभयंकर स्फोट होते. त्यात २५७ जणांना जीव गमवावा लागला होता, तर ७०० जण गंभीर जखमी झाले होते. या महाभयंकर स्फोटात याकूब मेमनचा सहभाग होता.

याप्रकरणी टाडा कोर्टाने याकूब मेमनला २७  जुलै २००७ रोजी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपतींचा दरवाजा ठोठावल्या नंतरही याकूबची फाशीची शिक्षा कायम राहिली आहे.

उद्या सात वाजता याकूबला फाशी होणार आहे. तर याकूबचा उद्याचा फाशीचा दिवस कसा असू शकतो ते पाहू.

पहाटे ३.४५ – गुन्हेगाराला पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी उठवलं जातं. आंघोळ आटोपून नवे कपडे दिले जातात.

पहाटे ४.१० – धर्मानुसार प्रार्थनेची सुविधा केली जाते. गुन्हेगाराच्या धर्मानुसार त्याला फाशी देण्यापूर्वी प्रार्थनेची सुविधा केली जाते.

पहाटे ४.४५ – धर्मानुसार प्रार्थना झाल्यानंतर गुन्हेगाराची ४ वाजून ४५ मिनिटांनी वैद्यकीय तपासणी केली जाते.

पहाटे ५ – पहाटे ५ वाजता गुन्हेगाराला त्याचा आवडीचा नाष्टा दिला जातो.

सकाळी ६ – नाष्टा झाल्यानंतर गुन्हेगाराला वाचण्यासाठी आवडीचे पुस्तक किंवा त्याला मनःशांतीसाठी धर्मग्रंथ दिला जातो.

सकाळी ६.३० – नाश्ता आणि वाचन झाल्यानंतर काही काळ गुन्हेगाराला आराम करावयास सांगितलं जातं.

सकाळी ७ – सकाळी ७ वाजता गुन्हेगाराला फाशी यार्डात नेलं जातं. त्याचप्रमाणे फाशी का होतेय याचं कारण समजावलं जातं.

सकाळी ७.३० – फाशीचं कारण समजावल्यानंतर गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर काळा कपडा घातला जातो. त्याला त्याच्या कृत्याबद्दल माफी मागायला सांगितली जाते.

सकाळी ८  – यानंतर दंडाधिकारी वेळ पाहून जल्लादाला किंवा तुरूंग अधिकाऱ्याला फाशी देण्याचा इशारा करतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.