मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी भव्य मानवी साखळी

पुणे शहराला स्मार्ट बनविण्या बरोबरच स्वच्छ बनविण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 7, 2017, 09:35 PM IST
मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी भव्य मानवी साखळी title=

पुणे : मुठा नदीच्या स्वच्छतेसाठी भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात पर्यावरणप्रेमींसोबत शाळकरी विद्यार्थी आणि स्थानिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. 

पुणे शहराला स्मार्ट बनविण्या बरोबरच स्वच्छ बनविण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. 

मात्र त्याची सुरुवात नदी पासून होणं करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शहर आणि नदी स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञाही यावेळी पुणेकरांनी घेतली.