मला माझ्या मुलीला भेटायचंय; याकूबची शेवटची इच्छा

'मला माहीत आहे की मी मरणार आहे... मला माझ्या मुलीला भेटायचंय...' हीच याकूबची शेवटच्या इच्छांपैंकी एक इच्छा होती... 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला आज ६.४५ च्या सुमारास फासावर चढवण्यात आलंय. 

Updated: Jul 30, 2015, 12:21 PM IST
मला माझ्या मुलीला भेटायचंय; याकूबची शेवटची इच्छा title=

नागपूर  : 'मला माहीत आहे की मी मरणार आहे... मला माझ्या मुलीशी बोलायचंय...' हीच याकूबची शेवटच्या इच्छांपैंकी एक इच्छा होती... 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला आज ६.४५ च्या सुमारास फासावर चढवण्यात आलंय. 

संविधानानुसार, ज्या व्यक्तीला फासावर चढवण्यात येतं... त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते.... आणि ही इच्छा पूर्ण केली जाते. 

याच नियमानुसार, याकूबला त्याची अंतिम इच्छा विचारण्यात आली तेव्हा त्यानं आपल्या २१ वर्षीय मुलीशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली, अशी माहिती याकूबच्या भावानं दिलीय.

तुरुंग प्रशासनानंही याकूबची ही इच्छा पूर्ण केली आणि फोनवरून त्याचा संपर्क मुलीशी करून दिला. आपल्या मुलीशी फोनवर बोलल्यानंतर याकूब खूश झाला होता. आज याकूबचा ५३ वा वाढदिवसही होता. 

सूत्रांच्या माहितीनुसार, फाशीवर चढवला जाण्यापूर्वी याकूब मेमन खूपच घाबरला होता. एखादा चमत्कारच आपल्याला वाचवू शकेल, अशीही आशा त्याला होती. 

सुप्रीम कोर्टानं फासावर शिक्कामोर्तब केल्यानंतर याकूबनं एका तुरुंगातील एका गार्डला 'आपल्याला' एखादा चमत्कार वाचवू शकेल असं म्हटलं.

आपण लवकरच मरणार आहोत... हे याकूबला एव्हाना कळून चुकलं होतं. पण, आपल्या फाशीवर राजकारण केलं जातंय, असंही त्याला शेवटपर्यंत वाटत होतं. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर याकूबचा भाऊ सुलेमान मेमन त्याला भेटण्यासाठी नागपूर तुरुंगात पोहचला होता. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.