दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध

दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. 

Updated: Dec 12, 2014, 11:59 AM IST
दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध  title=

अहमदनगर : दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याला पाणी सोडण्यास अहमदनगरवासियांचा विरोध अजूनही कायमच आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जायकवाडीच्या जलसाठ्यात 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेत. मात्र त्याविरोधात हायकोर्टात समाधानकारक निर्णय न मिळाल्यानं, प्रवरा सहकारी साखर कारखाना आता सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. 

तसेच अहमदनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विरोध आणि आंदोलनं सुरूच आहेत. मधुकर पिचड, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली घेराव आंदोलनं होणार आहेत.. तर सत्ताधारी शिवसेनाही राहुरीत आंदोलन करणार असल्यानं हा वाद चिघळलाय. तर दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून जायकवाडीत पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. 

मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुळा धरणातून जवळपास पाच हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. 89 किलोमीटर अंतरावरून हे पाणी तीन दिवसांत कायगाव टोका इथं पोचेल, असा अंदाज आहे. मुळा धरणातून पाच हजार क्‍युसेक पाण्याचा प्रवाह वाढवत हळूहळू सात हजार क्‍युसेकपर्यंत नेण्यात येणार आहे. तर भंडारदरा धरणातूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.