जवखेडा हत्याकांडाचा उलगडा, प्रशांत जाधवला अटक

जवखेडामधील दलित हत्याकांडाप्रकरणी मयत संजय जाधवचा पुतण्या प्रशांत जाधवला पोलिसांनी अटक केली. हत्याकांडानंतर तब्बल ४४ दिवसांनी आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.

Updated: Dec 4, 2014, 07:58 AM IST
जवखेडा हत्याकांडाचा उलगडा, प्रशांत जाधवला अटक title=

अहमदनगर : जवखेडामधील दलित हत्याकांडाप्रकरणी मयत संजय जाधवचा पुतण्या प्रशांत जाधवला पोलिसांनी अटक केली. हत्याकांडानंतर तब्बल ४४ दिवसांनी आरोपीला अटक करण्यात यश आले आहे.

जवखेडा हत्याकांडा प्रकरणी आरोपीला अटक होत नसल्याने अनेक राजकीय नेत्यांनी मोर्चे काढलेत. या हत्याकांडानंतर गावात तणावाचे वातावरण होते. तब्बल ४३ दिवस झाले तरी खूनाचा तपास होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दोन दिवसांपूर्वी तपास त्वरीत लागला नाही तर, हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात यश मिळविले. मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याला पोलिसांनी या हत्याकांडाप्रकरणी अटक केलीय.

२० ऑक्टोबर २०१४ रोजी घडली होती घटना, संजय जाधव, पत्नी जयश्री जाधव, मुलगा सुनील जाधव यांची झाली होती हत्या.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.