जयगडमधील जिंदाल प्रकल्पाचा फटका श्रद्धास्थानाला

रत्नागिरीजवळच्या जयगड येथील जिंदाल प्रकल्पाचा फटका आता क-हाटेश्वर इथल्या शेकडो वर्षांच्या श्रद्धास्थानालाही बसलाय. इथल्या गोमुखातून वाहणारं पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल आल्यानं गावकरी संतप्त झालेत.

Updated: Sep 8, 2015, 04:53 PM IST
जयगडमधील जिंदाल प्रकल्पाचा फटका श्रद्धास्थानाला title=

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या जयगड येथील जिंदाल प्रकल्पाचा फटका आता क-हाटेश्वर इथल्या शेकडो वर्षांच्या श्रद्धास्थानालाही बसलाय. इथल्या गोमुखातून वाहणारं पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल आल्यानं गावकरी संतप्त झालेत.

निसर्गरम्य जयगड परिसरात दहा वर्षांपूर्वी जिंदाल कंपनीचा ऊर्जा प्रकल्प स्थानिकांच्या माथी मारण्यात आला. जिंदाल प्रकल्पाकडून होणा-या प्रदूषणाविरोधात स्थानिक जनतेनं अनेकदा आंदोलनं केली. मात्र प्रदूषण सुरूच असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनीच केलाय.

जिंदाल प्रकल्पापासून अवघ्या काही फुट अंतरावर क-हाटेश्वराचे स्वयंभू देवस्थान आहे. तमाम रत्नागिरीकरांचं हे श्रद्धास्थान. इथल्या गो मुखातून वर्षाचे ३६५ दिवस स्वच्छ व निर्मळ पाण्याचा अखंड प्रवाह सुरू असतो, त्याला गंगा स्थान असंही म्हटलं जातं. दररोज शेकडो भाविक हे पाणी प्राशन करूनच मंदिरात प्रवेश करतात. मात्र या गोमुखातील पाणी पिण्यास योग्य नाही, असा धक्कादायक अहवाल आरोग्य विभागानंच दिलाय.

जिंदाल प्रकल्पातल्या शक्तिशाली सुरूंग स्फोटामुळं उडणारी फ्लाय अॅश व कोळशामुळं गोमुखातील पाणी प्रदुषित झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. मात्र जिंदालच्या अधिका-यांनी आरोप फेटाळलेत.

जेएसडब्ल्यू प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी मूक मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केलाय. हे प्रदूषण थांबलं नाही तर आंदोनल उग्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.